निर्मिती हि फार विचित्र गोष्ट आहे.

     निर्मिती हि फार विचित्र गोष्ट आहे. आणि जर मग ती एका भावना प्रधान व्यक्ती कडून केली गेली तर मग विचारूच नका. एखादा लहान मुलगा पहिल्यांदा पेन्सिल घेऊन कागदावर जेंव्हा गिरवायला सुरवात करतो(आपल्याकडे पाटी आणि पेन्सिल देऊन सुरवात केली जाते ह्याचा फायदा असा असू शकतो कि काळ्या पृष्ठभागावर पांढऱ्या रेघा ह्या निगेटिव चे काम करत असतील व त्या प्रतिमा मुलांच्या मेंन्दुत छापल्या जात असतील) तेंव्हा खरतर त्याच्या समोर कुठलाही आकार असण्याची शक्यता फारच कमी असते मुळात ते गिरवण हेतू पुरस्कृत नसत तर निर्माण होणाऱ्या रेष्यांचे त्याला फार कौतुक आणि कुतुहूल असतं.

       पहिल्या निर्मितीचा हा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात असाच येत असावा. पहिल्या बोलण्यात तो येत असेल हि पण त्याचा आनंद हा इतरांना जास्त असतो आणि त्यात आनंदा पेक्षाही गरजेचे प्रमाण अधिक आसत. आणि मग पुढे पुढे आपण आपल्या अवती भवति असलेल्या शक्यातांनुसार वाढतो. पुढे येणाऱ्या साऱ्या गोष्टी ढोबळपणे सारख्याच असतात. आईच्या हातातला हात सोडून मुल पुढे स्व:ताच्या पायावर सावरायला शिकतं, चालायला, धावायला लागत. पडतं, रडतं, हसतं,भाजत,खर्चटत, रक्त काढत, हाड तोडत, तापत,कुडकुडत आपल्या शरीराची तारुण्य येई पर्यन्तन परीक्षा घेत राहते.   
        आणि मग पहिले प्रेम होत. शरीरातल्या हार्मोन्स बदलायला सुरवात होते. आताचा हा बदल आतून असतो पण दिसत नसतो. अकारण एखादी व्यक्ती प्रचंड आवडू लागते ,गाण्यांतल्या शब्दांचे अर्थ कळू लागतात, जगातले सगळे जन चांगले वाटू लागतात. पाहट सोनेरी दिसू लागते, दुपार उबदार वाटायला लागते, आणि न कळत संध्याकाळ उदास करू लागते ,रात्री भूक लागत नाही, झोप लागत नाही, घड्याळाची  टिकटिक रात्रभर हुरहूर मोजत राहते. आणि पहाटे एक स्वप्न पडते. कालचे सगळे प्रश्न एका नकळतक्षणी आपली वाट शोधत पाझरतात, किलकिले डोळे आजूबाजूचा वेध घेतात, सुर्य अजून उगवला नसतो. पण तारुण्य मात्र अलगत तुमच्या कुशीत शिरत. आणि आपले टाइम टेबलच बदलते आयुष्याचं. हे पहिले प्रेम आपल्याला खूप काही शिकवत, एथ्पर्यन्तन तर सगळ प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात सारखाच होत असावे .
       पण जेंव्हा हे पहिले प्रेम आपल्या सोडून जातं (ते शक्यतो कधीच तुटत नाही) तेंव्हा मात्र झाडाच्या बुंध्याला फांद्या फुटाव्यात तसे आपण इतरांपासून फुटतो हे फुटण म्हणजे खरचं माणूस म्हणून आपल्याला वेगळे घडवणारा एक महत्वाचा टप्पा असतो, ह्या धक्यामुळेच आपण आपल्या आयुष्याकडे जास्त कठोरपणे बघु शकतो, जे नाही बघू शकत त्यांची वाढ खुंटते व ते कायमचे स्वतः भोवती एक आवरण घेऊन कुठंत जातात, पण जे यातून वाचतात ते वाढतात.जग ह्या पेक्षाही अधिक कठोर असतं, संवेदन ,भावना प्रधान व्यक्ती बऱ्याच वेळा धकके खातात.
      मुळातच ज्याचा गळ्यात सूर आहे अश्या व्यक्ती जेंव्हा प्रेमात पडतात मग ते प्रेम जगण्यावरचे असेलं, गाण्यावरच असेल कि एका व्यक्तीवरच असेल तेंव्हा त्यांच्या गाण्यात एक ओढ निर्माण होते. इतरांनाही त्यांना एकत राहावसे वाटते. त्यांच्या प्रत्येक मैफिली फुलतात. पन जेंव्हा ह्या व्यक्ती ते हे प्रेम हरवतात तेंव्हा त्यांच्या इतका जखमी कुणी असू शकत नाही. आणि मग त्याचे असे सूर उमताट कि ते हृदयच पिरघळवतात अश्या वेळी निर्माण झालेल्या कलाकृती त्या कलाकाराला नक्कीच आवडत नसतील पण रक्ताची चव लागलेले मांसाहारी त्या कलाकृतीचा आस्वाद फार चवी चवीने घेतात त्या कलाकारला फार उंचावर नेउन ठेवतात, त्याच्या चित्रांना करोडोंची बोली लावतात, त्याच्या मैफिली सोन्यानी तोलतात. त्याच्या इमारतींना जगातलं आश्चर्य मानतात, त्याच्या लेखणीला नोबल हि देतात आणि जर का त्यानी काही समाज हिताचे केले कि त्यालाच  संत  बनवतात. वर सुंदर ते शापित हे म्हणायला हि मोकळे.
     निर्मिती हि खरच फार विचित्र गोष्ट आहे. प्रत्येक अनुभवानंतर जसे आपण पाहिलेचे उरत नाही तसेच अनुभवानंत निर्मितिलेली प्रयेक गोष्ट हि स्वतंत्रच असते कारण कलाकार हा माणूसच असतो.
रुपेश  तळासकर
१२/१/१४
   Creation is a strange thing. And if it's done by a sensitive person, don't even ask. When a small child takes a pencil for the first time and starts drawing on paper (starting with a board and pencil can be useful as black surfaces can work negatively and lines made by pencil can be imprinted in the child's mind), there is very little chance that any shape will be formed as per the original intention, unless it is supported by the purpose of drawing. The child is more fascinated and enthusiastic about the lines drawn, rather than the shape being created. 
    May the joy of the first creation come to everyone in their lifetime. The joy of the first words spoken also comes, but its joy is greater for others and the need for that joy is even greater. And as we move forward, we grow according to our potential. Many upcoming things are always challenging. Mothers let go of their children's hands so that they can learn to walk, run and eventually race forward on their own. They fall, cry, laugh, fight, spend, bleed, break bones, sweat and strain their bodies until their youth is tested.
    And then there was first love. The hormones in the body began to change. This change continues to happen now, but it is not visible. For no reason, a person begins to like things more, the meaning of the words in songs become clear, and all the people in the world seem good. The mornings look like gold, the afternoons seem lively, and one starts to feel sad in the evenings. Hunger doesn't strike at night, sleep doesn't come easily, and the ticking of the clock keeps them entertained all night long. And in the morning, they have a dream. All the questions of the previous day find their way into their thoughts, their eyes tingle with the pain of the surrounding world, and the sun hasn't risen yet. But youth is different, it rests in your lap. And your timetable changes with your life. This first love teaches us a lot, and until now, it has been a part of everyone's life in different amounts.
    When this first love is lost (which may never truly break), it feels like falling into a pit of thorns, and we emerge from it different from others, having gained an important lesson in life. Due to this experience, we can often look at our lives with more severity, as what we cannot see can grow and become a perpetual shadow. However, what we read in this grows us. The world is often more severe than this, and many people frequently suffer setbacks that leave them emotionally drained.
    The person who has a vowel in their throat, when they fall in love, their love is like a song, as if it is only meant for one person. Then, in their song, a bond is created with that person, and others also feel drawn to them. Their every gathering is full of life. But when this person loses their love, no one can be as hurt as they are. And then their vowel rises so high that it pierces through their heart. The artwork they create may not appeal to everyone, but the carnivores who crave the taste of blood will savor it with relish. They will elevate the artist to great heights, bidding millions for their paintings, weighing their gold in their gatherings. Their buildings are marvels of the world, their writing earns them a Nobel, and if they do something for the good of society, they are called saints. This is called beauty and curse at the same time.
    Creation is a fascinating phenomenon. As we have seen, everything made after an event is individual since the creator is human.



Comments

Popular Posts