कारण तू माझ चित्र आहेस !

रंगांना स्पर्शत नाहीत कॅनवासचे कोरडे हात ..
पापण्यांना झेपत नाही तुझ्याकडे जाणारी वाट .
अधांतरीत लटकत्यात रस्त्या रस्त्यांवर कटलेल्या पेन्सिली ...
तुटलेल्या टोकि ,झिजलेले रबर, पुसलेल्या पाट्या.
अजूनही वाट बघतायत, खुर्च्या...विटांच्या भिंती , एझल्स ,गझल्स.....
रंगांना धुण्यासाठी घेतलेले पाणी अजूनही तसंच आहे ..गढूळ होऊन शुद्ध झालंय...
दूर दूर चालोय मी ह्या शहरातून ...
जिथे रंगांचा वास येत नाही.. मानस पोज देत नाहीत..
शब्दकोड सोडवायलासुद्धा पेन्सील मिळत नाही .
जिथे कुठल्याच जुन्या आठवणी पावसा सारख्या शिरत नाहीत .....
मन सैरा वैरा पळत नाही..भास होत नाहीत , राग येत नाही,प्रेम सुधा होत नाही...
तुझा चेहराही विसरून गेलोय मी,
पण खात्री आहे तू भेटल्यावर मी ओळखीन तुला ...कुठल्याही जन्मात..कधीही ...


कारण तू माझ चित्र आहेस !

Comments

Popular Posts