Dimensions of Canvas 1

कॅनव्हास च्या निळ्या भोर सागरात जेंव्हा मी लावतो एक तंद्री.
पाणी फेसाळलेलं किनाऱ्यावर येत... पण मागे जातचं नाही,
अविरहत चालणारे हे लूप ऍनिमेशन मुंबई बुडवतही नाही, आणि कोरडी पाडतंही नाही.
उडत राहतात कावळे .. फ्लॅशेस मध्ये पाठी कुठेतरी. त्यांना थांबावंसं वाटत नाही.
उतरावंस वाटत नाही. पोहावंस वाटत नाही.. फक्त उडत राहतात लूप मध्ये...
सूर्य जातो चंद्र येतो... चंद्र कधीच सारखा वाटत नाही. सूर्य कधीच चुकत नाही..
बदलत राहतो आभास प्रकाशाचा. कुणी रात्र म्हणत कुणी दिवस.
कुणी पावसाळा म्हणतं कुणी संध्याकाळ.
कुणी प्रेम म्हणतं कुणी जखम. .
डोळे उघडे असतात पण दिसत नाही,
सागर निळाभोर कधी दिसला होता? कधीच नाही...

"When I dive into the blue sea of canvas,
 I feel a sense of melancholy.
 The water comes ashore, forming waves,
 but it never goes back.
 This endless cycle neither drowns Mumbai 
nor dries it up. 
Crows keep flying around,
 never wanting to stop.
 I don't want to get down.
 I don't feel like swimming, 
I just want to keep flying around...

The sun sets and the moon rises..
.the moon never looks the same.
 The sun never spreads like the moon..
.the mark of light keeps changing. 
Some call it night, some call it day. 
Some call it monsoon, 
some call it evening. 
Some call it love, 
some call it a wound...

Eyes are open but can't see. 
When was the sea ever blue? 
Never."

Comments

Popular Posts