सेल्फ पोट्रेट 2



नेहमीच चित्र बोलत अस नाही ,संभोगात मुळी बोलण्याची गरजच नसते. इथे दोन आकारांच्या मधली जागा ताणायची असते, ताणायची मनाची,जणांची,स्तनांची, कणा कणाची.... आणि तुटू न देता त्यातली लय ... सांभाळायची असते एक पोकळी. त्या पोकळीत दिसू नयेत नाती शक्यतो. नसाव्यात नुसत्या बेरजा-वजाबाक्या अर्थशुन्य अंकांच्या, त्यात कुठलीच गोष्ट नसावी ज्याचा संदर्भ रुळलेल्या परंपरेशी आहे, केवळ आणि केवळ मुक्त स्वैराचार नांदावा त्या पोकळीत,जन्म जन्मान्ताराच्या उर्जेसारखा ... त्याला ना गुरुत्वाकर्षनाने प्रभावित करावे ना की ईश्वराने... आणि या पोकळीत तरंगणाऱ्या त्या विश्वाचे तुम्ही कर्ते आसावात.... तर जाणवू शकतील तुम्हाला कॅनवास च्या वरती आणि खाली लपलेल्या दोन नग्न प्रवृत्ती आजू बाजूचे असंख्य कान,... पुढे आणि पाठी चिकटलेली गुप्तांग .... खरंच, हे एक नागड सत्य आहे, प्रत्येक चित्र भोग घेत असतं.....


रुपेश तळासकर 10-2-2011

Comments

Popular Posts