Spectrum...

रंग माखले मातीने…. माती रंगाचीच होती. 
रंगाविना दुनियाची कहाणीच और होती…. 

रंग होते म्हणूनं कोणी, केली नाही प्रीत प्यारी.....

पण रंगाविना कशी कोणी त्यात उडी मारी. 

रंग नाचे, रंग साचे, कधी दरी डोंगराचे  . . 

ओल्या ओल्या मातीतील सुक्या सुक्या पावसाचे …. 

रंगासाठी युद्ध झाली.… रंगाकाठी ती नहांली 

रंगामुळे मानवाची प्रित बुद्धाकडे वळाली 

रंग अंधारालाही , रंग उजेडालाही…. 
प्रकाशात सांडलेल्या भय भावनांनाही… 

रंग असती फसवे, रंग आहेत की नाही?

रंगाशिवाय याचं उत्तरं कुणा ठाऊकचं नहि ........   

रुपेश र. तळासकर 

२५ जुलै २०१३ 

Comments

Popular Posts